अमर घटारे
अमरावती : देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष पूर्ण झाली. तरी देखील आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत (Amravati) नसल्याचा आरोप करत लोकसभेच्या निवडणुकीवर (Lok Sabha Election) बहिष्कार टाकत असल्याची घोषणा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच गावांनी केली आहे. (Live Marathi News)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील (Melghat) रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा- किन्हीखेडा आणि खोपमार या गावांचा समावेश आहे. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर गेल्या ७७ वर्षांपासून आम्ही मुलभुत सुविधांपासून वंचित असून आम्ही निवडून दिलेले एकही प्रतिनिधी आमच्या समस्यांच्या निराकरण करण्यास तत्पर दिसत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत, पक्के रस्ते यासारख्या एकही सुविधा आम्हाला मिळाल्या नसून प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली असता आमच्या समस्यावर तोडगा निघाला नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या मूलभूत सुविधांसाठी पाचही गावातील नागरिक एकवटले असून जोपर्यंत आमच्या समस्या निकाली निघत नाही, गावात मूलभूत सुविधा मिळत नाहीत; तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची घोषणा गावकऱ्यांनी केली आहे. तसेच बॅनर लावूनच गावकर्यांनी घोषणाबाजी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.