सांगली : राज्यात यंदा पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. गावागावात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने (Sangli) प्रशासनाकडून गावात ट्रँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र एन दुष्काळी परिस्थितीत जत तालुक्यात ट्रँकर चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसत पाणी ट्रँकर न भरण्याचा पवित्रा घेतल्याने गावात पाणी पुरवठा (Water Supply) होऊ शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. (Tajya Batmya)
राज्यात सर्वत्र यंदा कमी पाऊस (Rain) झाल्याने नदी, तलाव, धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. शिवाय वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत घाट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी (Water Crisis) पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. ही टंचाई निवारण्यासाठी पराशासनाकडून कृती आराखडा तयार करून ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असताना गावात नागरिकांकडून ट्रॅकर चालकांशी वाद घालण्याचे प्रकार होत आहे. शिवाय काही ठिकाणी मारहाण झाल्याचे देखील प्रकार घडले आहेत. यामुळे (Jat Taluka) जत तालुक्यात टँकर चालकांनी अघोषित आंदोलन सुरु केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पाणी ट्रँकर न भरण्याचा घेतला पवित्रा
पाणी पुरवठा केला जात असताना ग्रामस्थांकडून ट्रॅकर चालकांशी वादावाद आणि होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ टँकर चालकांनी पाणीपुरवठा करणे बंद केला आहे. या दरम्यान उटगी येथील तलावावर ४० हुन अधिक टँकर चालकांना ठिय्या मारला असून पाणी टॅंकर न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे काल रात्रीपासून संख, माडग्याळसह ३० ते ४० गावांचा पाणी पुरवठा बंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.