Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : मुलाचा वाढदिवस साजरा करून परतताना पित्याचा मृत्यू; रेल्वेत चढताना गेला तोल

Jalgaon News : मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला आले होते. पत्नी व मुलगा जळगावीच होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर अनिल जाधव हे १० मार्चला घरी जाण्यासाठी निघाले होते

Rajesh Sonwane

जळगाव : मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परत जाणाऱ्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन थेट खाली कोसळला. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १० मार्चला रात्री नऊच्या सुमारास घडली. जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

रावेर येथील अनिल जाधव (वय ३९) असे मृताचे नाव आहे. अनिल जाधव हे रावेरमध्ये कुटुंबीयांसोबत वास्तव्याला होते. दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला आले होते. पत्नी व मुलगा जळगावीच होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर अनिल जाधव हे १० मार्चला घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री नऊला ते जळगाव रेल्वेस्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले. 

धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरला 

अनिल प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्लॅटफॉर्म तीनवर आलेल्या कामायनी एक्स्प्रेस धकली. यामुळे अनिल हे धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान त्यांचा पाय सटकून तोल गेल्याने ते फलाट आणि रेल्वेतील पोकळीत सापडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचा घटनास्थळावर पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. 

नातेवाईकांचा आक्रोश 

दरम्यान पोलिसांनी कागदपत्रावरून मृताची ओळख पटवून कुटुंबीयांना कळविण्यात आले. यानंतर त्यांचे नातेवाईक दाखल झाले. मृत्यूची माहिती कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT