Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : दुसऱ्या दिवशी (ता.१४) सकाळी यश खाली न आल्याने त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली. बराचवेळ दार ठोठावून आवाज दिला, तरी प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला.

Rajesh Sonwane

जळगाव : जेईई परीक्षेत कमी गुण मिळाले. यामुळे नैराश्येत गेलेल्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेत आत्महत्या (Jalgaon) केल्याची घटना घडली. यश गणेश खर्चे (वय १८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जळगावच्या मेहरुण येथील जोशीवाडा परिसरात यश खर्चे हा आई-वडिलांसह वास्तव्यास होता. मेहरु परिसरात असलेल्या राज विद्यालयात १२ मध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान १३ फेब्रुवारीला जेईई परीक्षेचा (Student) निकाल लागला. या परीक्षेत यशला कमी गुण मिळाले होते. यामुळे तो नैराश्येत होता. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेच्या पूर्वी १३ फेब्रुवारीला कुटुंबीयांसह त्याने रात्री जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी (ता.१४) सकाळी यश खाली न आल्याने त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली. बराचवेळ दार ठोठावून आवाज दिला, तरी प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला. रूममध्ये मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर आईने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी धाव घेत यशला खाली उतरवून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT