जळगाव : ट्रकमध्ये खत आणल्यानंतर दुकानावर हे खत उतरविण्यासाठी ट्रकच्या छतावर चढून दोर सोडत असताना विजेचा धक्का लागून ट्रक चालकाचा (Death) मृत्यू झाला. सदरची घटना १४ फेब्रुवारीला सकाळी नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी (Jalgaon) जळगाव तालुका पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत नरसिंग प्रल्हाद सूरनार (वय २९, रा. बनवास, जि. परभणी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नरसिंग सूरनार हा ट्रक चालक १४ फेब्रुवारीला सकाळी आव्हाणे येथे खताच्या गोण्या घेऊन आला होता. काही दुकानावर खत उतरवण्यासाठी एका ठिकाणी ट्रक थांबवून चालक ट्रकवर चढला व दोर सोडत असताना वीज तारांचा (Electric Shock) स्पर्श होऊन जोरदार विजेचा धक्का लागला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विजेचा जोरदार झटका बसल्याने नर्सिंग सुरनार हा खाली कोसळला. खाली काँक्रिटीकरण केलेला रस्ता असल्याने त्याच्या डोक्याला देखील मार लागला. गावकऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी तालुका पोलीस पोहचून पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.