Saam Tv
सुंदर दिसण्यासाठी आयब्रोचा आकार महत्त्वाचा असतो. यामुळे चेहरा रेखीव दिसतो. आयब्रोचा आकार बदलला तर संपुर्ण चेहऱ्याचा लूकच बदलतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यानुसार आयब्रो करणे हे महत्त्वाचे असते.
गोल चेहऱ्यासाठी हाय आर्च असलेल्या आयब्रो योग्य ठरतात. यामुळे चेहरा अधिक लांब,शार्प दिसू लागतो.
ओव्हल चेहऱ्यावर सॉफ्ट अँगल किंवा हलक्या आकाराच्या आयब्रो आकर्षक दिसतात. याप्रकारचा आयब्रो जवळपास सगळ्याच चेहऱ्याला शोभून दिसतो.
चौकोनी चेहऱ्यासाठी सॉफ्ट कर्व्ह किंवा गोलसर आकार असलेला आयब्रो उत्तम दिसतो.
ज्यांचे कपाळ रूंद असेल त्यांना लो किंवा सॉफ्ट आकार असलेला आयब्रो चेहऱ्याला आकर्षक बनवतो. त्यामुळे रूंद कपाळ फारसे दिसत नाही.
ज्यांचा चेहरा बारीक आहे त्यांनी सरळ किंवा कमी आाकाराचा आयब्रो करावा. ज्यामुळे चेहरा रूंद दिसण्यास मदत होईल.
चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रोचा आकार जसा आहे तसा नैसर्गिक ठेवल्यास चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.