संदीप भोसले
लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातील शिवली मोड येथील विज उपकेंद्रात विद्युत कर्मचाऱ्यांनी ओली पार्टी केल्याचा (Latur) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या उपकेंद्रांतर्गत जोडलेल्या पाच गावांची (Mahavitaran) वीज प्रवाह खंडित झाल्याने ग्रामस्थ उपकेंद्रात आल्याने हा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Breaking Marathi News)
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शिवली मोड येथील महावितरणच्या (MSEDCL) उपकेंद्रावरून आजूबाजूच्या सहा गावांचा वीज प्रवाह जोडण्यात आला आहे. यातील ५ गावांचा वीज प्रवाह सायंकाळी ५ वाजेपासून खंडित झाला होता, ग्रामस्थांनी उपकेंद्रात फोन केले असता, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गावातील काही नागरिक उपकेंद्रात धडकले. यावेळी येथे मटण व दारूची ओली पार्टी झाल्याचे निदर्शनास आले. काहींनी याचा व्हिडीओ तयार केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ऑपरेटर नशेतच झोपलेला
५ गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक विद्युत उपकेंद्रात गेल्यानंतर उपकेंद्र कर्मचारीच दारूच्या आणि बियरच्या बाटल्या घेऊन बसल्याच सांगण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांनी येथील ऑपरेटरला उठविले असता तो नशेत असल्याने उठत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.