Latur Crime News : पाच लाखांच्या लाच प्रकरणी अहमदपूरचे मुख्याधिकारी, नगर रचनाकार एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल

दाेन्ही अधिकारी यांनी सात लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडी अंती पाच लाख रूपये स्विकारण्याचे निश्चित केले. त्यानंतर दाेघांवर सापळा रचण्यात आला.
acb arrests ahmedpur muncipal chief officer and one in five lakh bribe case
acb arrests ahmedpur muncipal chief officer and one in five lakh bribe case saam tv

- संदीप भाेसले

Latur News :

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे (ahmedpur chief officer kakasaheb doiphode) आणि त्याच्यासोबत असलेले अजय कस्तुरे (ajay kasture) या दोन अधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. या दाेघांवर अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत त्यांच्या मौजे मरशिवणी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील सर्वे नंबर 56 मधील 3600 चौरस मीटर क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्याकरिता अहमदपूर नगरपरिषद येथे दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये तक्रारदार यांनी ऑनलाइन चलान भरणा केलेला.

त्यांचे प्रलंबित कामाकरिता पाच फेब्रुवारीला नगरपरिषद कार्यालयात गेले असता त्यांना कस्तुरे यांनी त्यांचे प्रलंबित कामाकरिता स्वतःसाठी व मुख्याधिकारी यांच्यासाठी असे मिळून एकूण सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

acb arrests ahmedpur muncipal chief officer and one in five lakh bribe case
Maratha Samaj Rasta Roko Andolan : एक मराठा लाख मराठा... वैजापूर कन्नड मार्गावर रास्ता राेकाे, वाहतुक विस्कळीत

एसीबीने बुधवारी (ता. 14) शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता दाेन्ही अधिकारी यांनी सात लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडी अंती पाच लाख रूपये स्विकारण्याचे निश्चित केले. त्यानंतर कस्तुरे यांनी एका कारमध्ये पाच लाख रुपये शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्विकारली. यानंतर एसीबीने दोन्ही अधिकारी यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी अहमदपूरचे मुख्याधिकारी काकासाहेब सिध्देश्वर डोईफोडे (वय 39), नगर रचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे (वय 55) यांच्यावर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

acb arrests ahmedpur muncipal chief officer and one in five lakh bribe case
Crime News : पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकावर चाकू हल्ला, एकास अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com