Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident: मामाला भेटून येताना झाला घात; धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

Jalgaon News : मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील मूळ रहिवाशी असलेले सोनी हे नोकरीच्या निमित्ताने जळगावात वास्तव्यास होते

Rajesh Sonwane

जळगाव : दिवाळीची शाळांना सुटी असल्याने कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या मामाच्या घरी गेले असता परतीचा (Jalgaon) प्रवास करताना तरुण शिक्षकावर काळाने झडप घातली. रेल्वेने (Railway) प्रवास करत असताना धावत्या रेल्वेतून पडून शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव काही अंतरावर असताना ही घटना घडली आहे. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील रुस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत विजय शाम सोनी (वय २२) यांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील मूळ रहिवाशी असलेले सोनी हे नोकरीच्या निमित्ताने जळगावात वास्तव्यास होते. दरम्यान दिवाळीची शाळेला सुटी असल्याने या निमित्त ते कल्याण येथील मामांकडे गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला रेल्वेने प्रवास करीत होते. मात्र जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून सोनी हे खाली पडले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटना घडल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी जखमी अवस्थेत सोनी यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

थायलंडच्या हल्ल्यानं कंबोडियाचा संताप,राष्ट्रपती म्हणतात एका कॉलवर युद्ध थांबवणार

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Weight loss diabetes medicine: वजन कमी करणारं औषध आलं, डायबेटीसही कंट्रोलमध्ये राहणार, भारतात किंमत किती?

Bride Useful Things: नव्या नवरीच्या कपाटात असायला हव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT