Maratha Aarkshan
Maratha AarkshanSaam tv

Maratha Aarkshan: आरक्षणासाठी तरूणाने संपविले जीवन; चिठ्ठीवर लिहून ठेवले कारण

Dharashiv News : दोन दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची वाशी शहरात सभा झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाने जीवन संपविले आहे.
Published on

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत आहे. आरक्षण मिळावे यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (Dharashiv News) यानंतर आता वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील तरुणाने देखील (Maratha Aarkshan) आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. तशी सुसाईड न देखील या तरुणाने लिहून ठेवली आहे. (Maharashtra News)

Maratha Aarkshan
Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या सभेसाठी जय्यत तयारी; कल्याणमध्ये २० नोव्हेंबरला सभा

वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील विनोद ञिंबक गायकवाड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अजून निर्णय न घेतल्याने आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाज ठाम आहे. या दरम्यान काहींनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन थांबवत सरकारला मुदत दिली आहे. यानंतर राज्यात सभा होत आहेत. दोन दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची वाशी शहरात सभा झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाने जीवन संपविले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aarkshan
Nanded News : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

लिहून ठेवली सुसाईड नोट 

आत्महत्या केलेल्या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चिठ्ठी लिहुन गळफास घेतला. यात मी माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही म्हणून मी आता आंदोलन करून कंटाळलो आहे. त्यामुळे मी मरून जात आहे, त्यामुळे मी फाशी घेतली असा उल्लेख चिठ्ठीत केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com