संजय सूर्यवंशी
नांदेड : नांदेड शहराजवळच्या सोमेश्वर गावात वास्तव्यास असलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनींने गळफास घेत (Nanded) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू (Death) झाला. विद्यार्थिनीने ही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. (Latest Marathi News)
नांदेड शहराजवळ असलेल्या सोमेश्वर गावामध्ये ही घटना घडली आहे. या मुलीने १६ नोव्हेंबरला सायंकाळी घरात कोणी नसताना गळफास घेतला. मुलीने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान आज सकाळी तिचा मृत्यु झाला. मुलीने आत्महत्या केल्यामुळे परिवाराने एकच आक्रोश केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
दरम्यान आत्महत्येपूर्वी मुलीने चिट्टी लिहली असुन, मराठा आरक्षणासाठी तिने आत्महत्या केल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकानी केला आहे. मात्र मुलीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपासात ते समोर येईल. याप्रकरणी अजुन गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.