सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबारसह राज्यात अनेक भागात कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात (Nandurbar) दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या कमी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांना (farmer) नुकसान शान करावे लागत आहे. यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात टंचाई जाणवू लागली आहे. (Live Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या सरासरीची तूट मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यात सरासरी ३१ ते ३७ टक्क्यांपर्यंत पाऊस कमी झाला आहे. त्याचा परिणाम आता जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यावर होत आहे. मात्र खरीप हंगामाचे मका आणि ज्वारीच्या वाढ कमी झाल्याने त्यामुळे जिल्ह्यात चारा कमी आहे. त्याचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईच्या सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टींकडे तात्काळ लक्ष देऊन जनावरांना लागणारा चाऱ्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं झालं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चाऱ्यासाठी भटकंती
कमी पाऊस झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई जमविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी जनावरांसाठीच्या चार टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाय जो चार आहे त्याचे दर देखील महागले आहेत.