Kartiki Ekadashi 2023: 'कार्तिकी' निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी लातूरसह मिरजहून रेल्वेच्या ३५ फेऱ्या

यंदाच्या कार्तिकी यात्रेत प्रशासनाच्या अंदाजानुसार भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
special trains for pandharpur from miraj and latur on eve of kartiki ekadashi 2023
special trains for pandharpur from miraj and latur on eve of kartiki ekadashi 2023Saam TV
Published On

Pandharpur News :

पंढरपूरच्या कार्तिक यात्रेसाठी (Kartiki Ekadashi 2023) पंढरपूर- मिरज, लातूर आणि मिरज कुर्डूवाडी या मार्गाने विशेष रेल्वे गाड्यांसह 35 फेऱ्याचे नियोजन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. या सेवेचा भाविकांना निश्चित फायदा हाेईल असे देखील रेल्वे विभागाने म्हटले आहे. (Maharashtra News)

special trains for pandharpur from miraj and latur on eve of kartiki ekadashi 2023
Manoj Jarange Patil Sabha In Kolhapur: छत्रपतींना व्यासपीठावर स्थान द्यावे, मनाेज जरांगे पाटलांची इच्छा; जाणून घ्या काेल्हापुरातील वाहतुकीतील बदल

पंढरपुरात येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकीचा सोहळा साजरा होणार आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे आठ ते दहा लाख भाविक पंढरपुरात येतील असा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाेस पावले उचचली आहेत.

रेल्वे विभागाने देखील भाविकांची प्रवासाची गैरसाेय हाेऊ नये यासाठी विशेष गाड्या साेडल्या आहेत. यामध्ये लातूर - पंढरपूर , पंढरपूर मिरज, आणि मिरज कुर्डूवाडी अशा विशेष रेल्वे गाड्यांच्या २० नोव्हेंबर पासून ३५ फेऱ्या असणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे विदर्भ , मराठवाडा , दक्षिण महाराष्ट्रासह , कर्नाटक आणि गोवा येथील भाविकांना पंढरपूर पर्यंतचा रेल्वे प्रवास मिरज आणि लातूर स्थानकापासून सुखकर होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

special trains for pandharpur from miraj and latur on eve of kartiki ekadashi 2023
Raju Shetti Political Decision : महायुती, महाविकासच्या चाचपणीपासून राजू शेट्टी दाेन हात लांब, राजकीय पटलावर एकला चलाे रे...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com