Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Jalgaon News : पारोळा- भडगाव रस्त्यावर वळण रस्त्यावर बस व ट्रकचा आज झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता कि बसचा पत्रा कापला गेला आहे

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. 

पारोळा- भडगाव रस्त्यावर चोरवड-पारोळा दरम्यान आज दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. धुळे येथून सोयगावसाठी प्रवाशी घेऊन राज्य परिवहन महामंडळाची बस मार्गस्थ झाली होती. मात्र बस पारोळा कडे येत असताना वाग्रा वाग्री गावाजवळ आली असताना वळण रस्त्यावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसच्या चालक बाजूकडील पत्रा कापला गेला आहे. तर ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला होता.  

दोन प्रवासी गंभीर जखमी 

ट्रकने दिलेल्या धडकेत बसचा पुढील पत्रा कापला गेला असून धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रचंड आक्रोश झाला. अपघातातील जखमींना तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी प्रवाशांमधील दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

वाहतूक ठप्प 

अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त बस व ट्रक रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunjay Kapurs First Wife: ३ सुपरस्टारसोबत रिलेशनशिप, नंतर करिश्मा कपूरच्या एक्स नवऱ्याशी लग्न; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Shirdi Police : शिर्डीत भिक्षा मागणाऱ्या १२ मुलांची सुटका; पालकांवर गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Maharashtra Politics: खासदार धैर्यशील मोहितेंनी १५ ते १७ खून पचवले, स्थानिक नेत्याचा खळबळजनक दावा

Shocking : पेरू विक्रेत्याचा किळसवाणा कृत्य, थुंकी लावून पेरू विकताना दिसला; VIDEO झाला व्हायरल

SCROLL FOR NEXT