Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Nandurbar News : महामंडळाच्या सेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांसोबत असे गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: शाळा- महाविद्यालयात विद्यार्थी नियमित ये- जा करत असतात. दरम्यान अपडाऊन करत असलेल्या शालेय विद्यार्थिनींना एका बस कंडक्टरने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार बस स्थानकावर समोर आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक भूमिका घेत कंडक्टरवर कारवाईची मागणी केली. 

नंदुरबार येथे शाळेत रोज विद्यार्थिनी येत असतात. या दरम्यान नंदुरबार बसस्थानकावरून आईचाडे गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये धक्कादायक प्रकार घडला. बसमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. बसमध्ये चढताना जागा मिळत नसल्याने काही शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बस कंडक्टरकडे विचारणा करत होत्या. याचवेळी कंडक्टरने उद्धटपणे आणि अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ केली. कंडक्टरच्या या माजोरड्या वर्तनामुळे विद्यार्थीनीनी तीव्र संताप व्यक्त केला.

Nandurbar News
Fake Marriage : नाव बदलून केला विवाह; कुटुंबाकडून लग्नासाठी घेतले १ लाख ७० हजार रुपये, टोळीतील तिघे ताब्यात

विद्यार्थ्यांनी घातला अधिकाऱ्यांना घेराव 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सोबत घेऊन नंदुरबार बस आगाराच्या अधिकाऱ्यांचा घेराव घातला. यावेळी काही वेळ विद्यार्थ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कंडक्टरच्या गैरवर्तनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. तसेच संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Nandurbar News
Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

कंडक्टरने मागितली माफी 

दरम्यान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा वाढता रोष पाहता बस आगाराच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. या प्रकारानंतर संबंधित बस कंडक्टरने आपली चूक मान्य करत सर्व विद्यार्थ्यांसमोर जाहीर माफी मागितली. मात्र, विद्यार्थी परिषदेने केवळ माफीने हे प्रकरण मिटणार नाही, असे सांगत कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com