योगेश काशीद
बीड : विवाह इच्छुक मुलाच्या कुटुंबाला गाठून त्यांना मुलगी दाखवून विवाह लागून देणारी टोळी सक्रिय झाली होती. अशाच प्रकारे बीडच्या वडवणी तालुक्यातील लग्नाळू मुलगा व त्याच्या कुटुंबाकडून १ लाख ७० हजार रुपये घेऊन एका मुलीचे नाव बदलून तिचा तरुणाशी बनावट विवाह लावून देत फसवणूक करण्यात आली. आठवडाभरानंतर आई आजारी असल्याचे कारण सांगून एक महिला व पुरुष नवविवाहितेला घेण्यासाठी येत पसार झाले.
बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील एका २९ वर्षीय तरुणाचे लग्न होत नसल्याने त्याने ओळखीच्या असलेल्या महादेव जनार्दन घाटे (उपळी, ता. वडवणी) या व्यक्तीला लग्नासाठी मुलगी पाहण्यास सांगितले. त्यानुसार १० ऑगस्टला महादेव घाटे हा राधा कैलास जाधव या मुलीला व तिची आई वनमाला मुन्ना शर्मा (दोघी रा. कन्हैयानगर, जालना) यांना सोबत घेऊन घरी आला. राधा हिच्यासोबत लग्न करण्यास तयार असल्याचे तरुणाने सांगितले.
रात्रीच लावला विवाह
लग्नास होकार मिळाल्याने कैलास बाबा दळवी, जनार्दन प्रल्हाद थोरात (दोघे, रा. रिसोड, जि. वाशिम) व मुलीची मामी माधुरी फिरोज खान (रा. चिखली, जि. बुलढाणा) व अन्य एक महिला घरी आले. त्यांनी लग्नासाठी २ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर १ लाख ७० हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर त्याच दिवशी म्हणजे १० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता राधा व त्या तरुणाचा विवाह लावून देण्यात आला.
तिघांना घेतले ताब्यात
लग्नाच्या एक आठवड्यानंतर म्हणजे १८ ऑगस्टला वनमाला हिने सोमेश सुनील वाघमारे (रा. रमाबाईनगर, जालना) व प्रियंका ललितकुमार बाफना (मोंढा रोड, जालना) या दोघांना वडवणीत मुलीला घेण्यासाठी दोघांना पाठवले होते. मात्र कुटुंबीयांना शंका आल्याने प्रकरण पोलिस ठाण्यात गेले अन् बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला. या प्रकरणात वडवणी पोलिसात ९ जणांवर गुन्हा नोंदवला गेला. या प्रकरणात नवरी राधा मुन्ना शर्मा, प्रियंका ललितकुमार बाफना आणि सोमेश सुनील वाघमारे (तिघे रा. जालना) यांना अटक करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.