Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Pimpri Chinchwad News : दोन दिवस झाले पावसाचा जोर अधिक असल्याने मुळशी व मुळा धरणात पाणीसाठी वाढला असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून पाणी सोडले जात आहे
Pavana Dam
Pavana DamSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पिंपरी चिंचवड शहरात पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी पवना आणि मुळा नदी पात्रातील पाणीपातळी मोठी वाढ होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी दिली आहे. यामुळे सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. 

जोरदार पाऊस होत असल्याने धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे मुळा आणि पवना नदीला पूर आला आहे. सध्या पवना नदीपात्रात १५ हजार ५७० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर मुळशी धरणातून एकतीस हजार पाचशे क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. 

Pavana Dam
Pandharpur : पंढरपुरात चंद्रभागा दुथडी; मंदिरांना पाण्याचा वेढा, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

दरम्यान वाढलेल्या पाणी पातळीचा फटका प्रामुख्याने पिंपरी गाव, काळेवाडी, रावेत, पिंपळे गुरव आणि सांगवी परिसराला बसणार आहे. मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने याचा पुन्हा एकदा फटका पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठी असलेल्या रविवारची भागाला बसणार आहे; अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. 

Pavana Dam
Fake Marriage : नाव बदलून केला विवाह; कुटुंबाकडून लग्नासाठी घेतले १ लाख ७० हजार रुपये, टोळीतील तिघे ताब्यात

भिमानदीवरील पुल पाण्याखाली
भीमाशंकर परिसरात मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. या वाढलेल्या पाणलोटामुळे चास आणि कडूसला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदीपात्रावरील छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com