Bhadgaon News Saam tv
महाराष्ट्र

Bhadgaon News : भडगाव शहर स्फोटाने हादरले; हॉटेलमधील भीषण स्फोटात १० जण जखमी

Jalgaon News : चहा नाश्त्यासाठी हॉटेलवर मोठी गर्दी असताना अचानक मोठा स्फोट झाला. यामुळे परिसर हादरला असून या घटनेत हॉटेलमधील १० ते १५ जण गंभीर जखमी झाले असून सर्वाना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात आज दुपारच्या सुमारास एका हॉटेलमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळे परिसर हादरला असून या घटनेत हॉटेलमध्ये असलेले दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्फोट नेमका कशामुळे झाला; याचे कारण अद्याप समोर आले नाही. 

जळगावच्या भडगाव शहरात दुपारच्या सुमारास हि घटना घडली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नवी मिलन हॉटेलमध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. यामुळे आजूबाजूच्या परिसरात देखील हादरे बसल्याने नागरिक भयभीत झाले होते. तर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने पळापळ सुरु झाली होती. 

स्फोटात दहा जण गंभीर जखमी  

चहा- नाश्त्याचे हॉटेल असल्याने याठिकाणी नागरिकांनी नेहमी गर्दी असते. दरम्यान हॉटेलमध्ये अचानक स्फोट झाल्याने हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलेले सुमारे दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना भडगाव, पाचोरा व जळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलं. यातील काहींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

स्फोटाचे कारण स्पष्ट नाही 

दरम्यान, स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र उपस्थित काहींच्या मते हा स्फोट गॅस सिलेंडरचा तर काहींच्या मते फ्रीजचा कॉम्प्रेसर फुटल्याने झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तर प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्या – आगरी समाजाची ठाम मागणी|VIDEO

Ananya Panday: वॉटर बेबी! अनन्या पांडेचा एलिगंट बीच लूक पाहिलात का?

Maharashtra Politics: मला संपवण्याचा प्रयत्न केला..., भाजप खासदाराचं खळबळजनक विधान

IND vs PAK : पाकिस्तानचा सुपर फलंदाज 'सुपर फ्लॉप'! बुमराहला 6 षटकार मारणार होता पण पहिल्या चेंडूवर पडली विकेट, पाहा Video

Bachchu Kadu Slams Devendra Fadnavis: फडणवीसांची ही प्रवृत्ती रामाची नसून रावणाची; बच्चू कडूंचा जोरदार प्रहार |VIDEO

SCROLL FOR NEXT