Gadchiroli Police : घातपाताचा उद्देशाने ताडगाव जंगल परिसरात माओवाद्याकडून रेकी; गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात

Gadchiroli News : खूनासह जाळपोळ व भुसुरुंग स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेला माओवाद्याकडून घातपाताचा उद्देशाने रेकी केली जात होती. याच वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे
Gadchiroli Police
Gadchiroli PoliceSaam tv
Published On

गणेश शिंगाडे 

गडचिरोली : घातपात करण्याच्या उद्देशाने गडचिरोलीच्या ताडगाव जंगल परिसरात रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासावर असणाऱ्या खूनाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला हा आरोपी असून पोलिसांनी याला रेकी करताना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलीस दलाने आतापर्यंत १०९ माओवाद्यांना ताब्यात घेतले आहे. 

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे. याशिवाय देश विघातक कृत्य करत असतात. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण असल्याचे पाहण्यास मिळत असते. दरम्यान घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करत असलेल्या या माओवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Gadchiroli Police
Nandurbar : मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री शिरला अज्ञात व्यक्ती; रूममध्ये जात केला धक्कादायक प्रकार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अटकेवर २ लाखाचे होते बक्षीस 

सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल माओवाद्यास १३ सप्टेंबरला गडचिरोली पोलीस दलाने ताब्यात घेवून त्याला अटक केली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण १०९ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

Gadchiroli Police
Nagpur Police : एमडी तस्कर पोलिसांच्या ताब्यात; १२ ग्रॅम ड्रग्ससह मुद्देमाल जप्त

महिला नेता माओवाद्याचे आत्मसमर्पण  

जहाल महिला माओवादी नेता माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्र समितीची सदस्य असलेल्या सुजाताने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सुजाता ही १९८२ पासून माओवादी संघटनेत सक्रिय असून सुरुवातीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षातील सक्रिय होती. नंतर दंडकारण्यात तिने खूप महत्त्वाची भूमिका बजावली.अनेक हिंसक घटनांमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग आहे. ती माओवाद्यांच्या संघटनेत महत्त्वपूर्ण असलेला नंतर पश्चिम बंगालमध्ये ठार झालेला मोठा माओवादी नेता किशन जी याची पत्नी असून तिच्यावर सगळ्या राज्यात मिळून चार कोटी पेक्षा जास्तीचं बक्षीस आहे. सुजाताच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com