Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : धावत्या रिक्षाच्या चाकाचा एक्सेल तुटला; प्रवाशांनी भरलेली रिक्षा उलटली, एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Jalgaon News : जळगावच्या दिशेने प्रवासी घेऊन येणारी रिक्षा नशिराबादकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावरून जाताना अचानक रिक्षाच्या पुढील चाकाचे एक्सेल तुटले. यामुळे चालकाचे रिक्षावरील सुटल्याने रिक्षा रस्त्यावरच उलटली

Rajesh Sonwane

जळगाव : भुसावलकडून जळगावच्या दिशेने प्रवाशी घेऊन निघालेल्या रिक्षाला भीषण अपघात झाला. महामार्गावर धावत्या रिक्षाच्या पुढील चाकाचा एक्सेल तुटल्याने हा अपघात झाला. यात रिक्षा पलटी होऊन एकाच मृत्यू झाला. तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद गावाजवळ घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

भुसावळ शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणार वसीम खान ईस्माईल खान (वय २८) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. वसीम हा जळगाव येथील एमआयडीसीत एका कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान नेहमीप्रमाणे वसीम जेवणाचा डबा घेऊन भुसावळ येथून जळगावला कामावर येण्यासाठी घरून निघाला होता. यासाठी एका रिक्षात बसला होता. त्याच्यासोबत रिक्षामध्ये आणखी दोनजण होते. 

चाकाचा एक्सल तुटल्याने रिक्षा उलटली 

भुसावळकडून जळगावच्या दिशेने प्रवासी घेऊन येणारी रिक्षा नशिराबादकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावरून जाताना अचानक रिक्षाच्या पुढील चाकाचे एक्सेल तुटले. यामुळे चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्यावरच उलटली. यात वसीम खान हा रस्त्यावर फेकला गेल्याने त्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला. नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

दरम्यान वसीम खान हा गंभीर जखमी असल्याने याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. वसीम मृत झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तर इतर २ जखमींना नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते.  सदर अपघात प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT