Saam Impact News : जमिनीवर गादी टाकून उपचार; साम टीव्हीच्या बातमीची आरोग्य उपसंचालकाकडून दखल, जिल्हा रुग्णालयाकडून मागितला खुलासा

Jalna News : जालना जिल्हा रुग्णालय २०० खटांचे रुग्णालयांमध्ये अनेक बेड रिकामे असताना ४ जूनच्या रात्री एका रुग्णावर जनरल वार्डामध्ये जमिनीवरती गादी टाकून सलाईन लावून उपचार करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता
Jalna Civil Hospital
Jalna Civil HospitalSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अपघातग्रस्त रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराबाबत साम टीव्हीने दिलेल्या बातमीनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र यानंतर संभाजीनगर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्साकांना झालेल्या प्रकाराबाबत खुलासा मागवला आहे. 

जालना जिल्हा रुग्णालय २०० खटांचे रुग्णालयांमध्ये अनेक बेड रिकामे असताना जमिनीवर झोपून उपचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ४ जूनच्या रात्री एका रुग्णावर जनरल वार्डामध्ये जमिनीवरती गादी टाकून सलाईन लावून उपचार करण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची चर्चा होती. 

Jalna Civil Hospital
Erandol Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशय; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

रुग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर नाही 

दरम्यान या प्रकाराबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित प्रकारची रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा देखील केली. मात्र याबाबत कुठलेही समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाही. यामुळे जमिनीवर झोपवून उपचार करण्याचा नेमका उद्देश काय? हा प्रश्न उपस्थित झाला होता. 

Jalna Civil Hospital
Sant Muktai Palkhi : संत मुक्ताबाई निघाल्या विठुरायाच्या भेटीला; कोथळी येथून पालखी सोहळ्याचे प्रस्थान

रुग्णालयाला मागविला खुलासा 

दरम्यान या प्रकरणी साम टीव्हीने बातमी प्रसारित केल्यानंतर प्रभारी जिल्हा चिकित्सक यांनी सखोल तपासणी करणार असल्याचे साम टीव्हीला आश्वासन दिलं होतं. आता या बातमीची दखल घेत आरोग्य उपसंचालक कार्यालयाने जिल्हा सामान्य रुग्णालयाला या प्रकरणाचा खुलासा मागवला आहे. त्यामुळे साम टीव्हीच्या या बातमीची आरोग्य प्रशासनाने दखल घेतली असून याप्रकरणी संबंधितावरती काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com