Jalgaon News Forest Department Action Saam tv
महाराष्ट्र

Forest Department Action : ९० हजारांचे लाकूड जप्त; वन विभागाची कारवाई, चालक पसार

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : नायगाव - किनगाव रस्त्यावर पश्चिम वन विभागाच्या गस्ती पथकाने पीकअप व्हॅन वाहनासह (Jalgaon) पाच लाख रुपये किमतीचे खेर जातीचे मौल्यवान लाकूड जप्त केले. अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावर (Yawal) वाहन सोडून चालक पसार झाला आहे. (Live Marathi News)

वन विभागाला (Forest Department) मिळालेल्या गुप्त माहितीवरून २ जानेवारीला यावलच्या वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिमसह शासकीय वाहनाने नायगाव- किनगाव मार्गावरील रस्त्यावर गस्त होते. या वेळी किनगावकडे जात असताना एक संशयित वाहन भरधाव वेगाने जात असता त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक वाहन सोडून अंधारात पसार झाला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून पावतीने जमा करण्यात आले असून, जप्त माल वाहनासह त्यात असलेले खैर जातीचे अंदाजे ५ हजार घन मीटर लाकूड व वाहन तसेच मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ५ लाख रुपये एवढी आहे.
या कार्यवाहीत गस्ती पथकात वनपाल आर. बी. थोरात, वनपाल (वाघझिरा) विपुल पाटील, वनरक्षक (निंबादेवी) अक्षय रोकडे, वनरक्षक (मनुदेवी) चेतन शेलार, वाहनचालक योगिराज तेली तसेच पोलिस कर्मचारी सचिन तडवी यांनी सहभाग घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT