Jalgaon Accident News: भरधाव कारने शाळकरी मुलांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू, २ जखमी

Jalgaon News: कारमधून पाच जण प्रवास करत होते. गोराडखेडा गावानजीक या कारणे चार जणांना चिरडले. ही घटना गोराडखेडा (ता. पाचोरा) येथे घडली. याबाबत कारमधील पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jalgaon Accident News
Jalgaon Accident NewsSaam TV
Published On

Accident News:

जळगावमध्ये अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. पाचोरा येथे भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना मागून जोरदार धडक दिलीये. यात शाळकरी मुलीसह दोन जण ठार झालेत. तर अन्य दोन जण गंभीर आहेत. सदर घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरलीये.

Jalgaon Accident News
Central Railway Accident: मध्य रेल्वेवर आजचा दिवस ठरला अपघाताचा, गेल्या २४ तासांत ४ प्रवाशांचा अपघातात मृत्यू

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पाचोऱ्याहून जळगावकडे एक कार भरधाव वेगात निघाली होती. कारमधून पाच जण प्रवास करत होते. गोराडखेडा गावानजीक या कारणे चार जणांना चिरडले. ही घटना गोराडखेडा (ता. पाचोरा) येथे घडली. याबाबत कारमधील पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, कारने चौघांना चिरडल्यानंतर कार पूर्णता पलटी झाली होती. अपघातात सुभाष पाटील आणि दुर्वा पाटील जागीच ठार झाले आहेत. तर परशुराम पाटील आणि ऋतुजा भोईटे हे जखमी झाले आहेत. चौघांना कारची धडक लागली तेव्हा दोन जण उडून शेजारी असलेल्या शेतात पडले.

कार - दुचाकीच्या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू

बुधवारी रात्री देखील एक भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या घटनेत स्कूटीवरून जाणाऱ्या दोन तरूणांचा मृत्यू झालाय. हा अपघात रात्री साडे अकराच्या दरम्यान अर्धापूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील श्रीसंत किसन बापू आश्रमाजवळ घडला आहे.

Jalgaon Accident News
Pune Cyber Crime: अरे पोलिसांना तरी सोडा! चक्क पोलिसच अडकले सायबर चोरट्यांच्या जाळ्यात; ५ लाखांना लावला चुना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com