Agriculture News : लष्करी अळीने ज्वारीला घेरले; भुम तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळख जातो. या भागातील शेतकरी शेतीला पुरक म्हणून दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणावर करतात.
Agriculture News
Agriculture NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : रब्बी हंगामावर देखील संकट उभे आहे. हरभरा, ज्वारी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पडत आहे. (Dharashiv News) अशाच प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकावर संकट आले आहे. त्यामुळे (Farmer) शेतकरी हवालदिल झाला आहे. (Latest Marathi News)

Agriculture News
Jalgaon Accident News: भरधाव कारने शाळकरी मुलांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू, २ जखमी

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळख जातो. या भागातील शेतकरी शेतीला पुरक म्हणून दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे पशुधनाची संख्या देखील मोठी असल्याने ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. दरम्यान ज्वारी ही आता हुरड्यात आलेली असताना पुन्हा एकदा लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असुन ही अळी ज्वारीची पाने खाउन फस्त करत असल्याने शेतकऱ्यांना खरीप पाठोपाठ आता रब्बी हंगामात (Rabi Crops) देखील संकटाचा ठरत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Agriculture News
Sharad Pawar on Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शेतकरीपुढे संकट कायम 

एका संकटातून सावरत उभा राहत नाही, तोवर दुसरे संकट शेतकर्या समोर उभे राहिलेले पाहण्यास मिळते. खरीप हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसताना रब्बी हंगाम चांगला येण्याची आशा बळीराजाला होती. मात्र वातावरण बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई पडत असल्याने उत्पन्नात घाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com