Jamner Accident Saam tv
महाराष्ट्र

Jamner Accident : कारची रिक्षाला जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, पाच प्रवासी जखमी

Jalgaon News : समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षा दूरवर फेकली गेली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : भरधाव वेगाने येत असलेल्या येणाऱ्या चारचाकी वाहनाने पॅगो प्रवासी रिक्षाला जोरदार धडक (Jalgaon) दिली. या अपघातात रिक्षामधील एकजण जागीच ठार (Accident) झाला असून, ५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत व जखमी टाकळी खुर्द (ता. जामनेर) येथील रहिवासी आहे. (Tajya Batmya)

सदरचा अपघात जामनेर- टाकळी (Jamner) दरम्यान १९ मार्चला मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. रवींद्र आनंदा बावस्कर (वय ३०) असे मृताचे नाव आहे. टाकळी खुर्द येथील रवींद्र हा गाडेगाव येथील कंपनीत कामाला होता. १९ मार्चला रात्रीची शिफ्ट आटोपून रिक्षाने गावाकडे घरी निघाला होता. या दरम्यान समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षा दूरवर फेकली गेली. यात तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर अन्य प्रवाशी जखमी झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातातील जखमींना ग्रामस्थांनी तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये सुनील मुरलीधर सातव, रिक्षा चालक रामेश्वर बाजीराव मोरे, अनिल मुरलीधर सातव, अजय किरण चौरे व जीवन विकास अहिरे अशी जखमींची नावे आहे. राजू देवचंद बावस्कर (रा. टाकळी खुर्द, ता. जामनेर) यांचे फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

Iron Deficiency : जास्त चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता होते का?

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Lalbaghcha Raja : फटाक्यांच्या आतिषबाजीत लालबागच्या राजाला दिला निरोप, VIDEO

SCROLL FOR NEXT