Wardha News : १०४ दिवसानंतर उपोषण स्थगित; अपघातग्रस्त कुटुंबीय संतप्त, आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा उपोषणाचा इशारा

Wardha News : मदत अजूनपर्यंत मिळाली नसल्याने या कुटुंबियांनी गेल्या १०४ दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ सुरू केले होते.
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: समृद्धी महामार्गावर जुलै महिन्यात झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. राज्य शासनाकडून मृतांच्या (Wardha) नातेवाईकांना मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र मदत न मिळाल्याने (Accident) अपघातग्रस्त कुटुंबियांनी साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र आता आचारसंहिता लागल्याने या कुटुंबीयांनी साखळी उपोषण स्थगित केले आहे. (Live Marathi News)

Wardha News
Chalisgaon Accident : घरी परतणाऱ्या मजुरांच्या गाडीला अपघात; तीन मजूरांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) बुलढाणा जिल्ह्यामध्ये १ जुलै २०२३ रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात झाला होता. या अपघातामध्ये २५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. यात दोन वर्षाच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश होतो. अपघातानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रसार माध्यमांसमोर येत २५ लाखांची आर्थिक मदत कुटुंबीयांना दिली जाईल; अशी घोषणा केली होती. परंतु २५ लाखाची मदत अजूनपर्यंत मिळाली नसल्याने या कुटुंबियांनी गेल्या १०४ दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ सुरू केले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Sindhudurg News : कारमधून १० लाखाची रोकड जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची कारवाई

आचारसंहितेनंतर पुन्हा उपोषण 

या दरम्यान विविध आंदोलने करण्यात आली. परंतु न्याय न मिळाल्यामुळे कुटुंबियांचे साखळी उपोषण सुरू होते. १०४ व्या दिवशी प्रशासनाच्या विनंतीवरून कुटुंबीयांनी या उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. कुटुंबीय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा उपोषण सुरू करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com