Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident: विवाह समारंभ आटोपून परतताना काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

Jalgaon News : मित्राच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे जखमी झालेल्या अनिल पाटील यांनी जोरजोरात आरोळ्या मारल्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांनी अपघातस्थळी धाव घेऊन दोघांनाही खासगी वाहनाने रुग्णालयात आणले

Rajesh Sonwane

एरंडोल (जळगाव) :  विवाह समारंभ आटोपून सासरवाडी येथे जात असताना  भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या (Jalgaon) अपघातात ३८ वर्षीय युवक जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. हा (Accident) अपघात कासोदा रस्त्यावरील खडके गावाजवळ झाला. (Latest Marathi News)

कुंडाणे (ता. जि. धुळे) येथील अनिल रघुनाथ पाटील हे मित्र अरुण काळू मराठे यांच्यासह दुचाकीने विवाह समारंभासाठी आले होते. दुपारी विवाह पार पडला. या नंतर दोघेही भडगाव तालुक्यातील बलवाडी येथे अनिल पाटील यांच्या सासरवाडी येथे जात होते. दरम्यान कासोदा रस्त्यावरील खडके (Erandol) गावाजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे दोघेही खाली पडल्याने ट्रकचे मागील चाक अरुण मराठे यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मित्राच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे जखमी झालेल्या अनिल पाटील यांनी जोरजोरात आरोळ्या मारल्यामुळे शेतात काम करीत असलेले शेतकरी व शेतमजूर यांनी अपघातस्थळी धाव घेऊन दोघांनाही खासगी वाहनाने रुग्णालयात आणले. अपघातात जखमी झालेल्या अनिल पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT