Amravati News : विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून शासनाचा केला निषेध; सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्याची मागणी

Amravati News : निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे चार दिवसापासून उपोषण सुरू आहे
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अमरावतीत राबविण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेचा निकाल अदयाप जाहीर न झाल्याने (Amravati) हा निकाल लवकर जाहीर करावा, यासाठी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान आज स्वतःची तिरडी रचत विद्यार्थ्यांनी शासनाचा निषेध केला आहे. (Breaking Marathi News)

Amravati News
Beed Crime : खोटे सोने देऊन फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; अनेक गुन्ह्यांची उकल

सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीच्या वतीने वर्ष २०२१ मध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. जवळपास ५०० जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. परंतु तीन वर्षांनंतरही या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल मंडळाने जाहीर केलेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी (Student) केला आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे चार दिवसापासून उपोषण सुरू आहे. तरी देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेलेली नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News
Dhule Corporation : घरपट्टी वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक; महापालिकेत घोषणाबाजी

विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत:ची तिरडी रचून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनातून तत्काळ सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करावा, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नियुक्ती द्यावी; अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com