जळगाव : पैशांची गुंतवणूक करून त्याचा दुपटीने नफा मिळवून देण्याचे अमिष देत चाळीसगाव (Chalisgaon) येथील तरुणाला सायबर भामट्यांनी २ लाख ९६ हजारांचा गंडा घातला आहे. डिजिटल करन्सीत गुंतवणूक (Cyber Crime) केल्यावर नफ्यासह अतिरिक्त बोनस मिळणार या अपेक्षेने तरुणाने गुंतवणुक केली होती. यात फसवणूक झाल्याने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Breaking Marathi News)
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे खासगी नोकरी करुन कुटूंबाचा उदनिर्वाह चालवणारा तरुण संकेत जयराज बडगे (२५, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) याला व्हॉटस्अपवर तीन जणांनी संपर्क साधला. यात वेगवेगळ्या योजनेत गुंतवणुकीसाठी तयार केले. त्यातही डिजिटल करन्सीत गुंतवणूक केल्यावर (Online Fraud) दुपटीने नफ्यासह बोनसही मिळेल या आमिषापोटी संकेत बडगे याने रक्कम गुंतविली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सायबर पोलिसात धाव
संकेतने ३ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत वेळोवेळी ऑनलाईन रक्कम गुंतवली. दीड महिना होऊनही नफा मिळाला नाही. नफा तर दूरच राहिला मुद्दल रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे बडगे याच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावरुन मोबाईलवरुन संपर्कात असलेल्या परदेशी व्हॅटस्ॲप क्रमांकधारक तिघा सायबर गुन्हेगारांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.