Dharashiv News : कर्जबाजारीपणा व सावकाराचा जाच; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Dharashiv News : पुरेसा पैसे नसल्याने शेतीसाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. परंतु हे कर्ज फेड होऊ शकत नसल्याने काळे हे विवंचनेत होते
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शेतीसाठी खासगी सावकाराकडून कर्ज उचलले होते. परंतु शेतातून उत्पन्न मिळाले नाही. यामुळे कर्जाचा (Dharashiv News) बोजा डोक्यावर होता. यात सावकाराने पैशांसाठी तगादा लावला असल्याने शेतकऱ्याने (Farmer) टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. (Live Marathi News)

Dharashiv News
Gondia News: हतींच्या कळपाचा धुमाकूळ सुरूच; प्रतापगड मार्गावर झाले कळपाचे दर्शन


धाराशिवमधील कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील शेतकरी आण्णा काळे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलोपार्जित शेती असल्याने त्यातून उत्पन्न घेऊन घराचा उदरनिर्वाह आण्णा काळे करत होते. परंतु पुरेसा पैसे नसल्याने शेतीसाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. परंतु हे कर्ज फेड होऊ शकत नसल्याने काळे हे विवंचनेत होते. याच विवनचनेतून अण्णा काळे यांनी पिंपळगाव शिवारातील शेतात पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.  

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dharashiv News
Wada Bhivandi Highway Blocked : काम होऊनही रस्ता जैसे थे; संतप्त नागरिकांचा वाडा भिवंडी राज्य महामार्गावर रास्ता रोको

सुसाईड नोटमधून केले मदतीचे आवाहन 
अण्णा काळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली आहे. यात खाजगी सावकाराचा ञास व तेरणा कारखान्याने ऍडव्हॉस रक्कम न दिल्याचा चिठ्ठीतत उल्लेख केला आहे. शिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे श्रीधर भवर यांनी कुटुंबाला आर्थीक मदत करण्याबाबत चिठ्ठी लिहून आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com