Gondia News: हतींच्या कळपाचा धुमाकूळ सुरूच; प्रतापगड मार्गावर झाले कळपाचे दर्शन

Gondial News : शेतातील धानपिक, पोल्ट्री फार्म, पॅक हाऊस व धान पोत्यांचे देखील मोठे नुकसान केले होते
Gondia News
Gondia NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 

गोंदिया : हत्तीच्या कळपाने गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात धुमाकूळ माजविण्याची (Elephants) मालिका संपता संपत नाही. शेतातील पिकांचे नुकसान करण्यासोबत पोल्ट्री फार्मचे देखील यापूर्वी (Gondia) नुकसान केले आहे. यात आता हरभरा पिकाचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

Gondia News
Uday Samant: दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टाेला

गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात १० डिसेंबरला दाखल झालेल्या हत्तींच्या या कळपाने शेतातील धानपिक, पोल्ट्री फार्म, पॅक हाऊस व धान पोत्यांचे देखील मोठे नुकसान केले होते. तर १३ डिसेंबरला रामघाट येथे हत्तीच्या कळपाने आदिवासी कुटुंबीयांचे राहते घर व धानाचे प्रचंड नुकसान केले. नशीब बलवत्तर म्हणून यात तिघांचे प्राण वाचले होते. शेतात उभे असलेल्या हरभरा पिकाचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gondia News
Nana Patole News : गंमत जंमत बंद करा, राज्याच्या प्रश्नाकड़े लक्ष द्या; नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

बंदोबस्त कसा होणार 

हत्तींचा कळप रात्रीच्यावेळी शेत शिवारात फिरून पिकांचे नुकसान करत आहे. यात हा कळप गावात शिरल्यास तेथे देखील नुकसान करण्याची शक्यता आहे. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे (Farmer) शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी या हत्तीच्या कळपाचे नागरिकांना दर्शन झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com