Nana Patole Eknath Shinde
Nana Patole Eknath ShindeSaam tv

Nana Patole News : गंमत जंमत बंद करा, राज्याच्या प्रश्नाकड़े लक्ष द्या; नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Bhandara News : २५ वर्षात रस्ते कोणी धुतले नाही, तर वेगळीच धुलाई सुरू होती. यावर्षी मुंबईतील नालेसफाई चांगली त्यामुळे कुणाला गाणं बनवण्याची वेळ आली नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे
Published on

शुभम देशमुख 

भंडारा : राज्याच्या मुळ प्रश्नावर बेरोजगारी, शेतकरी, महागाई यावर बोलायला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वेळ नाही. मात्र स्वच्छता मोहिमे दरम्यान विरोधकांना टोमने मारण्यास मुख्यमंत्राना वेळ आहे. त्यामुळे ही गंमत जंमत बंद करा आणि राज्याच्या प्रश्नाकड़े लक्ष द्या; अशा शब्दात (Nana Patole) नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Breaking marathi News)

Nana Patole Eknath Shinde
Girish Mahajan News : पक्षात राहून चोऱ्या, आर्थिक घोटाळे केल्याने खडसेंना हाकलले; गिरीश महाजन यांचा खडसेंवर निशाणा

मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान विरोधकांना टोला लगावला आहे. २५ वर्षात रस्ते कोणी धुतले नाही, तर वेगळीच धुलाई सुरू होती. यावर्षी मुंबईतील नालेसफाई चांगली त्यामुळे कुणाला गाणं बनवण्याची वेळ आली नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे. त्यावर स्वतःही पाठ थोपाटायची तर थोपाटा. आम्ही विधानसभेत पहिल्या दिवशी शेतकरी, बेरोजगारी व महागाईवर बोलतो. (Bhandara) मात्र मुख्यमंत्री बोलायलाही तयार नसेल तर ही गंभीर बाब असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानां पटोले यांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nana Patole Eknath Shinde
Fraud Case : खोट्या सह्या, अंगठे घेत बँक कर्मचाऱ्याकडून खातेदारांची फसवणूक

महाराष्ट्रातील उद्योग पळविण्यासाठीच हे खोक्याचे सरकार
महाराष्ट्रातील उद्योग पळविण्यासाठीच हे खोक्याचे सरकार आणले गेले आहे; असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या डायमंड हबच्या उद्घटानबाबत प्रश्नावर ते बोलत होते. ही खोक्याचे सरकार आल्यावर बुलेट ट्रेनसाठी पैसे उपलब्ध करून देण्यात आले. मुंबाईची प्रॉपर्टी अदानीला दिली. अदानी यांना जीएसटी माफ आहे, इनकम टैक्स माफ आहे. सर्व करण्यासाठीच हे सरकार आणले गेले. त्यामुळे डायमंड उद्योग बाहेर जाने हे काही नवीन नाही. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणे हा मोदी यांचा डाव आहे. त्यामुळे डायमंड हबचे मोदीद्वारे उद्दघाटन होणे हे महांराष्टाच्या जखमेवर मीठ चोळन्यासारखे आहे; असे नानां पटोले म्हणाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com