सरकारमध्ये आतंकवाद्यांना मदत करणारी लोक बसलेली आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते अकोल्यात जिल्हा परिषद पोट निवडणुकी संदर्भात आले होते. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण तापलेला आहे. दाऊदच्या सोबतीचे सरकारमध्ये बसलेत, असा आरोप त्यांनी केला आहे. एनआयए आणि एटीएसच्या कारवाया नंतर राज्य सरकार आतंकवादी कारवायांना मान्यता देणार सरकार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गरिबी हटावचा नारा काँग्रेसने दिला होता, मात्र काँग्रेसने गरीबच हटवल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. यावर प्रतिक्रिया देण्यास नाना पटोले यांनी टाळलं.
अमरावती मधील ताफा अडवल्याच्या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावत नाना पटोले म्हणाले की, ''हे खोटं बोलणार सरकार आहे, यांच्या राज्यात शेतकरी, तरुण, गृहिणी कोणीच सुखी नाही. लोकांमध्ये सध्या अशांतता असल्याने सरकारमधील आमदार, मंत्र्यांना सुरक्षेमध्ये फिरावं लागत आहे. हे जिथे जातील तिथे लोक त्यांना अडवतील.'' (Latest Marathi News)
ते म्हणाले, ''भाजप प्रणित सरकारने शाहू, फुले , आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक न्यायाची भूमिका संपुष्टात आणली. ओबीसी विरुद्ध मराठा अशी मोठी दरी निर्माण केली. 14 ते 19 च्या काळात फडणवीस सरकारने मराठ्यांना फसवलं. त्यामुळे लोकांना सरकारवर विश्वास राहिला नाही.''
इंडिया आघाडीची दार वंचितसाठी बंद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याबाबत दिल्लीत काय चर्चा झाली मला माहीत नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी वंचितचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.