Pune Half Marathon: पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये उत्तम पाटीलने मारली बाजी; महिलांमध्ये रेश्मा केवटेने पटकावला पहिला क्रमांक

Bajaj Allianz Pune Half marathon 2023: पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये उत्तम पाटीलने मारली बाजी; महिलांमध्ये रेश्मा केवटेने पटकावला पहिला क्रमांक
Pune Half Marathon
Pune Half MarathonSaam Tv
Published On

>> अक्षय बडवे

Bajaj Allianz Pune Half marathon 2023:

प्रत्येक वर्षागणिक भारतातील आघाडीच्या धावपटूंचे आकर्षण ठरू लागलेली सकाळतर्फे आयोजित बजाज अलियान्स पुणे अर्ध मॅरेथॉन यंदाही पुरुष व महिला गटातील दिग्गज धावपटूंच्या सहभागामुळे रंगतदार झाली. हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 21.1 किलोमीटर प्रकारात उत्तम पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने त्याने 21.1 किलोमीटरचे अंतर अवघ्या 1 तास 5 मिनीटे आणि 4 सेकंदात पूर्ण केलं आहे.

यातच महिलांमध्ये 21.1 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत रेश्मा केवटेने पहिला क्रमांक पटकावला आहे. तिने तिने 1 तास 13 मिनिटे आणि 18 सेकंदात ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यासोबतच 10 किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये महिला विभागात साक्षी जडियालने 36 मिनिटे 52 सेकंद वेळ नोंदवत पहिली आली. पुरूष विभागात असिफ खानने 30 मिनिटे 25 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Half Marathon
Sri Lanka Power Cut: श्रीलंकेत बत्ती गुल! संपूर्ण देश अंधारात, नेमकं कारण काय?

२१ किलोमिटर हाफ मॅरेथॉन विजेते

तिसरा: ए बी बिलियाप्पा १ तास, ६ मिन, १२ सेकंद

दुसरा: संतोष जेधे, १ तास ,५ मिन २१ सेकंद

पहिला: उत्तम पाटील, १ तास ५ मिन ४ सेकंद (Latest Marathi News)

२१ किलोमिटर मॅरेथॉन विजेते (महिला)

तिसरा: लिली दास, १ तास २० मिन १६ सेकंद

दुसरा: निरमाबेन ठाकोर, १ तास १७ मिन २२ सेकंद

पहिला: रेश्मा केवटे, १ तास १३ मिन १८ सेकंद

१० किलोमिटर मॅरेथॉन विजेते (महिला)

तिसरा: सृष्टी रेडेकर, ३७ मिन ३२ सेकंद

दुसरा: रिंकी पावरा, ३७ मिन ०३ सेकंद

पहिला: साक्षी जडियाल, ३६ मिन ५२ सेकंद

Pune Half Marathon
Ahmednagar Accident News: उसाने भरलेला ट्रक उलटला, एका महिलेचा जागीच मृत्यू

१० किलोमिटर मॅरेथॉन विजेते (पुरुष)

तिसरा: अंकुश हक्के, ३० मिन ५५ सेकंद

दुसरा: शुभम भंडारे, ३० मिन ४० सेकंद

पहिला: असिफ खान, ३० मिन २५ सेकंद

दरम्यान, या मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे अवघ्या 10 वर्षीय काव्या देशमुखने. पुण्यातील या चिमुरडीने एकूण 21 किलोमिटर हाफ मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता आणि विशेष म्हणजे तिने ही मॅरेथॉन पूर्ण केली. एवढ्या लहान वयात 21 किलोमिटर धावणाऱ्या काव्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सुद्धा गर्दी झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com