Uday Samant: दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टाेला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावे लागेल असेही सामंत यांनी नमूद केले.
uday samant criticizes uddhav thackeray in ratnagiri
uday samant criticizes uddhav thackeray in ratnagirisaam tv
Published On

Ratnagiri News :

गेल्यावेळी 90 हजार मताधिक्याने निवडून आलो. यावेळी दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हा आत्मविश्वास तुमच्यामुळे आहे असे उद्याेगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी नमूद केले. मंत्री सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी शहरातील तब्बल 122 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Maharashtra News)

मंत्री उदय सामंत म्हणाले मागच्या अडीच वर्षांत सवांदाची कोणाला सवय नव्हती. काही लोकं फक्त फेसबुक लाईव्ह करायचे. म्हणजे मी बोलल्यानंतर समोरून कोणी बोलूच नये, ही त्यांची भूमिका असायची. एकतर्फी संवाद, मी सांगेन तेच बरोबर आहे ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाही असे म्हणत सामंत यांनी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना टोला मारला.

uday samant criticizes uddhav thackeray in ratnagiri
Pune News : बाबा आईरा शाब बनावट नावाने भोंदूबाबाचा पुण्यात वावर, पैशांचा पाऊस प्रकरणी जगताप अटकेत

सामंत पुढे बाेलताना म्हणाले स्वतः आरोग्याचं दुखणं असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी पाच किलाेमीटर पेक्षा अधिक इर्शाळगड चढून गेले. तेथील दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावे लागेल असेही सामंत यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान गेल्यावेळी 90 हजार मताधिक्याने निवडून आलो, यावेळी दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हा आत्मविश्वास तुमच्यामुळे आहे असे जनतेचे आभार मानत उदय सामंत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

uday samant criticizes uddhav thackeray in ratnagiri
Success Story: निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा तांदळाचे महत्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com