तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Jiban Pradip Dash Resign From BJP: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले जीवन प्रदीप डेश यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चिटफंड घोटाळ्यातील आरोपी नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यामुळे भाजपमध्ये नैतिकता उरली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Former BJP MLA Jiban Pradip Dash announces his resignation from the party during a press conference, citing decline in political ethics
Former BJP MLA Jiban Pradip Dash announces his resignation from the party during a press conference, citing decline in political ethicsSaam Tv
Published On

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी पक्षावर नैतिकता ढासळल्याचा आरोप केला आहे. तीन वेळा आमदार राहिलेले आमदार दैश यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने तीव्र विरोध दर्शवला होता.

Former BJP MLA Jiban Pradip Dash announces his resignation from the party during a press conference, citing decline in political ethics
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; राजकारणात खळबळ

ते म्हणाले, 2024 मध्ये ओडिसामध्ये आलेल्या सततेनंतर भाजपमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नाहीये. CBI च्या चौकशी फेऱ्यात अडकलेले आणि जमानतवर जेलमधून बाहेर आलेल्या माजी खासदाराला भाजप जर पक्षात प्रवेश देत असेल तर पक्ष आपल्या नीती आणि मूल्यांपासून खूप लांब गेला आहे आणि यामुळे भाजपला मोठा परिणाम भोगावा लागणार आहे असा जोरदार हल्लाबोल यावेळी दैश यांनी केला. राज्य नेतृत्वावर निशाणा साधत ते म्हणाले, चिट फंड घोटाळ्याचा आरोपीला पक्षात प्रवेश देऊन आता भाजपमध्ये नीतीमत्ता शिल्लक राहिली नाहीये.

Former BJP MLA Jiban Pradip Dash announces his resignation from the party during a press conference, citing decline in political ethics
मुख्यमंत्र्यांच्या हॅलीपॅड कॅम्पसमध्ये अचानक बैल घुसला; हवालदार जीव मुठीत घेऊन धावला, नेमकं काय घडलं?

भारतीय वायु सेनेचे माजी सैनिक जीवन दैश हे पहिल्यांदा 2000 मध्ये भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी BJD मध्ये प्रवेश केला. ते 2009 आणि 2014 मध्ये देखील निवडून आले. मात्र 2020 मध्ये त्यांना काही कारणास्तव पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. दैश नेमक्या कोणत्या पक्षात जाणार आद्याप तरी त्यांनी सांगितले नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com