Bus Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात; प्रवाशी थोडक्यात बचावले

Jalgaon News : अपघात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी घडला. खाजगी बस अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती
Chalisgaon Bus Accident
Chalisgaon Bus AccidentSaam tv
Published On

चाळीसगाव (जळगाव) : खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचा आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना (Chalisgaon) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ घडली. सुदैवाने बस पलटी झाली त्याठिकाणी जास्त खोल भाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र बसमधील (Bus Accident) प्रवाशी जखमी झाले आहेत.  (Live Marathi News)

Chalisgaon Bus Accident
Cotton Theft: शेतातील गोडाऊनमधून ३५ क्विंटल कापसाची चोरी; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

सदर अपघात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Dhule Solapur Highway) सकाळी घडला. खाजगी बस अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान सकाळी बस मेहुणबारे (ता. चाळीसगाव) गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गावाजवळील गिरणा पुलाच्या जवळ जुन्या मोरावर बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. बस पलटी झाल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी जोरात आरोड्या (Jalgaon) मारल्या. अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक मदतीसाठी धावले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chalisgaon Bus Accident
Koli Samaj Reservation : कोळी समाज आंदोलक- मंत्री गावित यांच्यात बाचाबाची; आदिवासी आरक्षणाच्या मागणीवरून समाज आक्रमक

तीन प्रवाशी जखमी 

मेहुणबारे गावाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसून यात बसमधील तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनचे विष्णू आव्हाड यांच्यासह टीमने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महामार्ग पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com