Koli Samaj Reservation : कोळी समाज आंदोलक- मंत्री गावित यांच्यात बाचाबाची; आदिवासी आरक्षणाच्या मागणीवरून समाज आक्रमक

Nandurbar News : आक्रमक कोळी समाज बांधवानी आदिवासी असल्याचे जात प्रमाणपत्र का दिली जात नाही? असा थेट सवाल विचारण्यात आला
Koli Samaj Reservation
Koli Samaj ReservationSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोळी समाज बांधव हे चांगलेच आक्रमक होत असल्याचे दिसून आले आहे. (Nandurbar) आदिवांसींचे आरक्षण मिळावे यासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या कोळी बांधवांनी मुंबईत रेल्वे स्थानकावर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना जाब विचारला. यावेळी (Vijaykumar Gavit) मंत्री गावित व कोळी बांधवांमध्ये शाब्दिक चकमक झाली. (Maharashtra News)

Koli Samaj Reservation
Cotton Theft: शेतातील गोडाऊनमधून ३५ क्विंटल कापसाची चोरी; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

कोळी समाज बांधव आदिवासी जातीचे प्रमाणपत्र मिळावे; यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी कोळी समाज बांधव मुंबईत दाखल होत आहेत. याच दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे मुंबई रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी त्या ठिकाणी आंदोलनासाठी जाणाऱ्या कोळी समाज बांधवांनी त्यांना घेराव घातला. आक्रमक कोळी समाज बांधवानी त्यांना आदिवासी असल्याचे जात प्रमाणपत्र का दिली जात नाही? असा थेट सवाल विचारण्यात आला. डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या परीने संबंधित आंदोलकांची समज घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक आणि डॉ. गावित या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाल्याचे पाहायला मिळालं. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Koli Samaj Reservation
Bullock Cart Race : बुधगावच्या बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हे दाखल

डॉ. गावित यांच्या विरोधात घोषणाबाजी 

यावेळी डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेमध्ये वापरही करण्यात आल्याचे व्हायरल झालेल्या विडिओत दिसत आहे. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत डॉ. गावित यांना या आंदोलकांपासून सुरक्षितपणे लांब नेले. स्थानकावर असलेल्या  इलेक्ट्रिक वाहनांत बसवून सुरक्षारक्षक मंत्री विजयकुमार गावित यांना रेल्वे स्थानकाबाहेर घेऊन आले. त्यामुळे पुढील वाद टळला.  या वायरल व्हिडिओ बाबत मात्र अधिकृत भूमिका दोन्ही बाजूने अद्याप मांडण्यात आलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com