जळगाव : जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग (Jalgaon) केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सदर महिलेच्या पतीने मोबाईलमध्ये शूटिंग केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)
जळगाव शहरातील खासगी श्री संतुलन हॉस्पिटलमचे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती. दरम्यान १४ नोव्हेम्बरला सकाळी साडेनऊच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्डबॉय नीलेश ज्ञानेश्वर बाविस्कर (रा. कांचन नगर, जळगाव) याने काहीही आवश्यकता नसताना महिलेस (Crime News) लज्जा उत्पन्न होईल; असे कृत्य करत विनयभंग केला. सदर प्रकारणानंतर पीडितेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून संशयित वॉर्डबॉय नीलेश बाविस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मोबाइलमध्य केला व्हिडीओ
संशयित वॉर्डबॉयच्या हालचालींवर संशय आल्याने महिला उपचार घेत असताना मोबाईलमध्ये त्याच्या हालचालींचे व्हिडिओ चित्रित झाल्यावरून या गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याची दखल घेत गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.