Sambhajinagar Accident: भाऊबीजच्या दिवशीच भाऊ हिरावला; बहिणीकडे जाताना झाला अपघात

Sambhaijnagar News : दुचाकीने संभाजीनगर शहरात येत असताना टँकर व २ दुचाकीचा अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे
Sambhajinagar Accident
Sambhajinagar AccidentSaam tv

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीची धामधूम झाल्यानंतर सासरवाशी मुलगी भाऊबीजेला माहेरी येत असते. (Sambhajinagar) यामुळे दिवाळीनंतर भाऊबीजसाठी बहिणीला घ्यायला गेलेल्या भावाचा अपघात (Accident) झाला आणि त्याचा मृत्यू झाला. यामुळे भाऊबीजच्या दिवशीच भावाला गमावल्याचे दुःख बहिणीवर ओढवले आहे. (Maharashtra News)

Sambhajinagar Accident
Pandharpur News: साहेब आम्हाला न्याय द्या, शाळेला रस्ता द्या...; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शरद पवारांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण रोडवरच्या कांचनवाडी परिसरात हा अपघात झाला आहे. संभाजीनगरातील कांचनवाडी परिसरात राहत असलेल्या बहिणीला भाऊबीजेसाठी घेऊन जाण्यासाठी केशव विठ्ठल भिसे (वय २३) आणि सुरेश परदेशी गुरुजी (वय ७५, रा. बालम टाकली) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीने संभाजीनगर शहरात येत असताना टँकर व २ दुचाकीचा अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar Accident
Bhandara News : विषारी धान खाल्ल्याने ८ कोंबड्यांचा मृत्यू; लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल

भाऊबीजची अखेरची आठवण 

भाऊबीजनिमित्ताने (Bhaubeej) बहिणीला घेऊन जाऊ या उद्देशाने केशव भिसे हा बहिणीच्या घरी आला होता. परंतु भाऊबिजेच्या दिवशीच भावाला हिरवल्याचे दुःख बहिणीवर ओढवले आहे. यामुळे आपल्या लाडक्या भाऊरायासोबतची यंदा अखेरची भाऊबीज ठरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com