Uttarakhand Tunnel Accident: स्पेशल विमान आणि मशीन....; बोगद्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या ४० कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठा प्लान

Uttarakhand Tunnel Accident: ज्यावेळी संपूर्ण देश दिवाळी साजरी करण्यात मग्न होता, त्यावेळी उत्तराखंडमध्ये ४० कामगार बोगद्यात अडकले. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Uttarakhand Tunnel Accident
Uttarakhand Tunnel AccidentSaam Digital
Published On

Uttarakhand Tunnel Accident

ज्यावेळी संपूर्ण देश दिवाळी साजरी करण्यात मग्न होता, त्यावेळी उत्तराखंडमध्ये ४० कामगार बोगद्यात अडकले. चारधाम प्रकल्पांतर्गत ब्रम्हखाल-यमनोत्री राष्ट्रीय राज्य मार्गावर बोगद्याच्या खोदाई दरम्यान ही दुर्घटना घडली असून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान यासाठी स्पेशल विमानाने मशीन मागवण्यात आली असून नॉर्वे आणि थायलंडच्या विशेष रेस्क्यू टीमचीही मदत घेतली जात आहे.

बोगद्यात अडकलेल्या या कामगारांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक पथकं तर दिवसरात्र प्रयत्न करत आहेतच. शिवाय विदेशी मदतही घेतली जात आहे. नॉर्वे आणि थायलंडच्या रेस्क्यू पथकांशी संपर्क करण्यात आला आहे. २०१८ मध्ये एका गुहेत अडकलेल्या मुलांना तब्बल ९ दिवसानंतर थायलंडच्या टीमने सुरक्षित बाहेर काढलं होतं. तर बोगद्यातील बचाव मोहिमेसाठी नॉर्वेच्या एनआरआय एजन्सीसोबत दिल्ली मेट्रो आणि भारतीय रेल्वेची मदत घेतली जात आहे.

कामगारांना कधीपर्यंत सुरक्षित बाहेर काढलं जाईल याबाबत सांगणं कठीण आहे. मात्र या मोहिमेसाठी आमच्याकडे बॅकअप प्लान देखील तयार होता. राज्य सरकार देखील मदत करत आहे. मात्र या कामासाठी उपयोगी असलेली स्टेट ऑफ आर्ट मशीन सध्या दिल्लीत आहे. ही मशीन तब्बल २५ टन वजनाची असून भारतीय हवाई दलाच्या तीन एअरक्राफ्टमधून एअरलीफ्ट करण्यात येत आहे. मशीन आल्यानंतर त्याचे पार्टस जोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती एनएचआयडीसीएलचे संचालक अंशो मनिष खालको यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttarakhand Tunnel Accident
Haryana News: हरियाणाच्या नूंहमध्ये वायू गळती, 24 कामगारांची प्रकृती खालावली, उपचार सुरु

सध्या ८०० मीमीच्या पाईपच्या माध्यमातून बोगद्यात जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यात काही अडथळे येतायेत. दोन दिवसांपूर्वी आम्ही २१ मीटर पर्यंत आत गेलो होतो. मात्र बोगद्यात जेवढं आतमध्ये खोदण्याचा प्रयत्न करतो तेवढी दरड पुन्हा कोसळते. त्यामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान दिल्लीतून मशीन आल्यानंतर काम पुन्हा सुरू केलं जाणार आहे. सर्व कामगार ६० मीटर अंतरावर अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी १५ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Uttarakhand Tunnel Accident
Doda Bus Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण बस अपघात! ३६ जणांचा मृत्यू; १९ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com