Doda Bus Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण बस अपघात! ३६ जणांचा मृत्यू; १९ जखमी

Jammu Kashmir Bus Accident: स्थानिक अधिकारी, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे.
Kashmir Bus Accident:
Kashmir Bus Accident:Saamtv
Published On

Jammu Kasmir Doda Bus Accident News:

काश्मिरमधून एक भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस किश्तवाडहून जम्मूकडे निघाली होती. या दुर्घटनेत ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकारी, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात (Doda Bus Accident) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळली. अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. डोडा येथील पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार अपघातातील मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. तर, जखमींची संख्या १९ इतकी आहे. जखमींना जिल्हा रुग्णालय किश्तवाड आणि सर्वसाधारण रुग्णालय दोडा येथे नेण्यात आलं आहे.

Kashmir Bus Accident:
Satara: आंतरराज्य टोळी जेरबंद; २७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस,एक किलो सोन्यासह पाच किलो चांदी हस्तगत

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला...

दरम्यान, या भीषण अपघातानंतर पंतप्रधान मोदींनीही (PM Narendra Modi) शोक व्यक्त केला आहे. 'जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com