Akola Accident: बस आणि दुचाकीचा भीषण अपघात! २० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; संतप्त जमावाने महामार्ग रोखला

Akola News: अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

हर्षदा सोनुने, प्रतिनिधी

Akola Accident News:

अकोल्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्याच्या मुर्तीजापुर तालुक्यातील कुरणखेड येथील राष्ट्रीय राज्य महामार्गावर दुचाकी आणि बसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये वीस वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातल्या (Akola) मुर्तीजापुर तालुक्यातील कुरणखेड येथील राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक ६वर भीषण अपघात झाला. वणी रंभापुरजवळ टूव्हीलर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात निपाना येथील 19 वर्षीय युवतीचा जाग्यावर मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला. या ठिकाणी नेहमीच अपघात होतात. त्यामुळे वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाण पुलाची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत उड्डाण पुलाची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत बॉडी उचलणार नसल्याची भूमिकाही गावकऱ्यांनी घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Accident News
Swabhimani Shetkari Sanghatana Andolan : राजू शेट्टींनी साखर कारखाना काढून दाखवावा असे नेत्याने म्हणताच स्वाभिमानीचे आंदाेलक खवळले अन्...

बुलढाण्यात बर्निंग कारचा थरार

बुलढाणा जिल्ह्यात एका चालत्या ट्रकने पेट घेतल्याने बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडी गावा नजिक चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले आहे. (Latest Marathi News)

Accident News
NCB Raids: मुंबईसह दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई; १५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दोघांच्या मुसक्या आवळल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com