Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

Jalgaon Crime News : शेतात जाताना वाटेत गाठून केली हत्या; रावेर तालुक्यातील घटना

Raver News : घरी परतला नसल्याने वडीलांनी त्याला फोन केला. मात्र कोणताच प्रदिसाद मिळत नसल्याने वडीलांनी छोट्या भावाकडे फोन करून विचारणा केली
Published on

रावेर (जळगाव) : शेतात जात असताना रस्त्यात गाठून डोक्यामध्ये दगड टाकून हत्या केल्याची घटना रावेर तालुक्यातील (Jalgaon) निंबोल शेत शिवारात घडली आहे. ऐनपुर (ता. रावेर) येथील रहिवासी शेख अफजल शेख असलम उर्फ कालू (वय २७) याची हत्या करण्यात आली. सदर घटना १४ नोव्हेंबरला घडली असून निंभोरा (Police) पोलिस स्टेशनला फिर्यादी फिरोज खान मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)  

Jalgaon Crime News
Milk Price decrease : ९ महिन्यांत दूध दरात १५ रुपयांची घसरण; शेतकरी दुहेरी संकटात

ऐनपूर (ता. रावेर) येथील मयत  शेख अफजल शेख असलम हा १४ नोव्हेम्बरला दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतात जात असल्याचे सांगून घरून निघाला. शेतात जात असताना त्याने मित्राची दुचाकी नेली होती. परंतु तो घरी परतला नसल्याने वडीलांनी त्याला फोन केला. मात्र कोणताच प्रदिसाद मिळत (jalgaon Crime) नसल्याने वडीलांनी छोट्या भावाकडे फोन करून विचारणा केली. लहान भाऊ शेख फारुक हा त्याच्या शोधात शेताकडे गेला असता अफजलचा मृतदेह आढळून आला.  मात्र दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास त्याची ऐनपूर- निंबोल दरम्यान निंबोल शिवारात गायरान जमिनीच्या रस्त्यांवर (Crime News) त्याचा मृतदेह आढळून आला. ज्या रस्त्यांवर मृतदेह आढळला त्या रस्त्यांवरच त्याचे शेतही आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Crime News
Buldhana News : ड्रग्स सदृश पदार्थ सेवनाने वर्षभरात सात जणांचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यात वाढले विक्रीचे प्रमाण

शेख अफजल हा म्हशी विक्रीचा व्यवसाय करून शेती करत होता. त्याची घरची परीस्थीती जेमतेम आहे. शांत आणि संयमी अशी त्याची ओळख होती. त्याचा खुन झाला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटूंब हे द्वारदर्शनावर मलकापुर येथे गेले होते. मृतदेहाजवळ एका भलामोठा दगड आढळून आला आहे. त्याच्या हत्येमागे नेमका कोण व किती जण आहे हे सध्या सामोर आले नाही. या खुनाच्या घटनेमुळे परीसर हादरला आहे. स्वान पथक दाखल होत पंचनामा करत पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com