Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : जळगावात खून सत्र सुरूच; भररस्त्यावर तरुणाची धारदार शस्त्र भोसकून हत्या

Jalgaon Crime News : नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ruchika Jadhav

संजय महाजन, जळगाव

जळगाव जिल्ह्यात खूनाची मालिका अद्यापही थांबलेली नाही. शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह पथकाने धाव घेतली. मयताचा खून का केला, कुणी केला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत चैकशी सुरू केली आहे.

सिंधी कॉलनी रस्त्यावर सकाळी कामाला जाण्यासाठी काही व्यक्ती घराबाहेर पडल्या. तेव्हा रस्ताच्या कडेला त्यांना एक व्यक्ती झोपलेला दिसला. त्याची बॅगही तेथे पडली होती. थोडी रहदारी वाढली तरी तो उठत नव्हता. त्यामुळे काहींनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा हा मृतदेह असल्याचं तेथील व्यक्तींच्या लक्षात आलं.

जुन्या वादातून तरुणाचा खून

जळगावात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. २३ मे रोजी देखील येथे एका तरुणाचा खून झाला होता. मयत तरुण त्याच्या मित्रांसह रात्री हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्यावेळी जेवताना अन्य तरुणांनी जुन्या वादाचा बदला घेत या तरुणाची हत्या केली.

कालीका माता मंदिर परिसरात रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली होती. किशोर असं मृत मुलाचं नाव आहे. किशोर आणि अमोल दोघेही बाहेर जेवण्यासाठी गेले होते. तेव्हा ५ जण त्यांच्या जवळ आले आणि त्यांना मारहण करु लगाले. यात किशोरचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT