Shruti Vilas Kadam
अॅलोवेरा जेल काढून टाळूवर आणि केसांच्या मुळांमध्ये हलक्या हाताने मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते व केसांची वाढ होते.
२ चमचे अॅलोवेरा जेलमध्ये १ चमचा नारळ तेल मिसळा. आठवड्यातून २ वेळा लावल्यास केस मजबूत आणि दाट होण्यास मदत होते.
कांद्याच्या रसासोबत अॅलोवेरा जेल मिसळून टाळूवर लावा. हा उपाय केस गळती कमी करून नवीन केस उगवण्यास मदत करतो.
अॅलोवेरा जेल, दही आणि मध मिसळून केसांवर लावा. ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा. केसांना पोषण मिळते.
थोडे अॅलोवेरा जेल ओलसर केसांवर लावा. केस मऊ, चमकदार आणि घनदाट दिसतात.
एरंडेल तेलासोबत अॅलोवेरा जेल मिसळून टाळूवर लावा. यामुळे केसांची जाडी वाढण्यास मदत होते.
आठवड्यातून किमान २–३ वेळा अॅलोवेरा वापरल्यास ४–६ आठवड्यांत केसांच्या वाढीत फरक जाणवतो.