Sakshi Sunil Jadhav
jio ने त्यांच्या युजर्ससाठी २८ दिवसांचा सगळ्यात स्वस्त प्लान आणला आहे. जो सगळ्यांच्याच खिशाला परवडणारा आहे.
नवीन प्लॅन
jio त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवीन प्लान सादर करत असतं. त्यात नव्या वर्षात अनेक स्वस्त रिचार्ज प्लानचा समावेश आहे.
jioच्या रिचार्ज प्लानची किंमत ही फक्त १२४ रुपये आहे. ही किंमत सर्वसामान्यांना परवडणारी आहे.
jioचा हा नवा प्लान एकूण २८ दिवसांचा आहे. यासोबत तुम्हाला इतर काही सुविधा मिळणार आहेत.
jioच्या या रिचार्जप्लानमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळणार आहेत. कारण यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळणार आहे.
जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 14GB डेटा मिळणार आहे. जो दिवसाला 0.5GB डेटा मिळेल.
जर युजर्सचा डेटा संपला तर युजर्सला 64Kbps च्या स्पीडचा डेटा मिळेल. तर ३०० एसएमएस देखील मिळतील.
jioच्या प्लॅनमध्ये सगळ्यात जास्त फायदे मिळतात. ज्यात JioSaavn आणि JioTV चा वापर करु शकता.
ज्यांना कमी किमतीत दीर्घ वैधता आणि सर्व टेलिकॉम फायदे हवे आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे.