Jalgaon Crime: भुसावळ दुहेरी हत्याकांड: मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अंदाधुंद गोळीबार करत केली माजी नगरसेवकाची हत्या

Bhusawal Crime News: भुसावळ शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे. याप्रकरणी आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Jalgaon Crime: भुसावळ दुहेरी हत्याकांड: मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अंदाधुंद गोळीबार करत केली माजी नगरसेवकाची हत्या
Bhusawal Crime News: Saamtv

तबरेज शेख, नाशिक ता. ३१ मे २०२४

भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडाने जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे. बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली असून मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता. या हत्याकांडामधील मुख्य सुत्रधार संशयित करण परतुडे याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली.

शहरातील मरी माता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोटारीत बसलेल्या बारसे व राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर हल्लेखोर भुसावळसह व जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते. जळगाव पोलिसांची विविध पथके हल्लेखोरांच्या शोधात होती. आठ संशयितांपैकी एकाला भुसावळमधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साक्रीमधून पथकाने ताब्यात घेतले होते. गोळीबार करणारा मुख्य संशयित हल्लेखोर हा मात्र फरार होता.

Jalgaon Crime: भुसावळ दुहेरी हत्याकांड: मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अंदाधुंद गोळीबार करत केली माजी नगरसेवकाची हत्या
Prajwal Revanna : मोठी बातमी! प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक; एसआयटी पथकाने ठोकल्या बेड्या

त्यालाही गुंडाविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला त्याने दोन गावठी पिस्तुल लावलेले आढळून आले. तसेच त्याच्या ताब्यातून पाच जीवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहेत. अटकेनंतर त्याच्याकडून दोन गावठी कट्टे, मॅगझिन, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Jalgaon Crime: भुसावळ दुहेरी हत्याकांड: मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अंदाधुंद गोळीबार करत केली माजी नगरसेवकाची हत्या
Mumbai Mega Block News: मेगाब्लॉकचा रेल्वे प्रवाशांना फटका; मुंबई-पुणे दरम्यान 29 एक्सप्रेस रद्द, लोकल प्रवाशांचेही हाल होणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com