KDMCमध्ये बॅनर वॉर; राजकारणातील 'बाजीगर'; शिंदेंनी भाजपला डिवचलं

Political Gambler Banner In KDMC Election: कल्याण डोंबिवलीत ‘राजकारणातील बाजीगर’ बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. केडीएमसी सत्तास्थापनेचे श्रेय खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंना देत लावण्यात आलेल्या बॅनरमुळे भाजप–शिंदे गटात नव्या चर्चांना उधाण आले आहे
Political banner in Kalyan-Dombivli praising MP Shrikant Shinde sparks intense debate ahead of KDMC mayor swearing-in.
Political banner in Kalyan-Dombivli praising MP Shrikant Shinde sparks intense debate ahead of KDMC mayor swearing-in.Saam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली शहरात भव्य बॅनर झळकले असून, त्यावरील राजकारणातील बाजीगर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे या आशयाच्या मजकुरामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापलेले दिसून आले. निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतर भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्या. दोन्ही पक्षांमध्ये तीव्र रस्सीखेच पाहायला मिळाली होती.

अखेर ३ फेब्रुवारी रोजी शिंदे गटाचा महापौर कल्याण डोंबिवली महापालिकेत विराजमान होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शिंदे गटाच्या यशामागे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. राजकीय समीकरणे जुळवून आणण्यात आणि सत्ता स्थापनेत त्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळेच महापौरपद शिंदे गटाकडे आले, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

Political banner in Kalyan-Dombivli praising MP Shrikant Shinde sparks intense debate ahead of KDMC mayor swearing-in.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? पक्षाचे वरिष्ठ नेते एकाच नावावर ठाम

विशेष म्हणजे, ४ फेब्रुवारी रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस असल्याने या राजकीय यशाचे श्रेय देत नागरिक व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागात अभिनंदनपर बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राजकारणातील बाजीगर असा उल्लेख केल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरमुळे एकीकडे शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात या बॅनरची मोठी चर्चा आहे

Political banner in Kalyan-Dombivli praising MP Shrikant Shinde sparks intense debate ahead of KDMC mayor swearing-in.
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? सुमारे 1 लाख कोटी, 14 महत्वाचे ठळक मुद्दे

महापालिका निवडणुकामध्ये महायुतीमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पुण्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस विरुद्ध भाजप तर कल्याणमध्ये भाजप आणि शिंदेगटात राजकीय चकमक दिसून आली होती. आता निवडणूक होऊन अनेक दिवस उलटून गेले तरी भाजप विरुद्ध शिंदे हा वाद पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com