Bhusawal Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Accident : सुसाट गाडी आदळली दुभाजकावर; चालकाचा जागीच मृत्यू 

Jalgaon News : १७ जानेवारीला पहाटे ४ वाजता चारचाकीने भुसावळ येथून ड्युटी असल्याने दिपनगर येथे जाण्यासाठी निघाला होता

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दिपनगर (ता.भुसावळ) येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने जाणारी चारचाकी गाडी दुभाजकावर (Accident) आदळली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. (Breaking Marathi News)

भुसावळ शहरातील रहिवासी देवेंद्र पवार हा आई-वडील पत्नी आणि भावासोबत वास्तव्याला होता. देवेंद्र हा चालक म्हणून दिपनगर केंद्रात नोकरीला होता. (Jalgaon) दरम्यान १७ जानेवारीला पहाटे ४ वाजता चारचाकीने (Bhusawal) भुसावळ येथून ड्युटी असल्याने दिपनगर येथे जाण्यासाठी निघाला होता. दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन दुभाजकावर आदळली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोक्याला मार लागल्याने मृत्यू 

अपघातात देवेंद्रच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर जखमी चालकाला तातडीने जळगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रेखा, वडील जलंदर दगडू पवार, भाऊ भूषण आणि पत्नी योगिनी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT